अकोला – बाळापुर तालुक्यात हातरुन परिसरातील मांजरी या गावातील शेतीचे मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे … शेतात पाणी साचले असुन मुसळधार पावसामुळे शेती खरडून गेली आहे … जोरदार पाऊस झाल्याने भल्ले मोठे खड्डे शेतात पडले आहेत ….
मांजरी गावातील जवळपास सर्व च शेतकऱ्यांना आधी दुबार पेरणी ला सामोरे जावे लागले होते त्यातच आत्ता गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेती पिकासह खरडून गेली असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे …
तरी प्रशासनाने तात्काळ नुकसान झालेल्या शेतीची पाहणी व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत …