आपल्या जीवनात गुरुचे विशेष स्थान
मानवता पथ बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली – आपल्या संस्कृतीमध्ये गुरूला विशेष महत्त्व असून गुरुशिवाय तरणोपाय नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात कोणाला तरी गुरु मानावे व त्यांनी दिलेल्या गुरुमंत्राचे पालन करावे असे प्रतिपादन मानवता पथ बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीच्या वतीने नागोबा मंदिर गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरूपौर्णिमा उत्सव सोहळ्याच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले.
यावेळी मंचावर अध्यत्मिक गुरु दादाश्री, गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा परिषदेच्या सभापती रंजिता कोडाप, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित गुरुभक्तांना मार्गदर्शन करताना आमदार डॉ देवराव होळी यांनी अंधश्रद्धा व श्रद्धा यातील अंतर समजावून सांगितले विज्ञानाच्या मदतीने आज आपण पुढे गेलो तरी एक अज्ञात शक्तीचा वावर आपल्या जीवनात असतो त्या शक्तीला ओळखण्याची तिला समजून घेण्याची पात्रता आपल्याला गुरुमुळे मिळते. त्यामुळे आपल्या जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन आमदार डॉ देवराव होळी यांनी यावेळी केले. गडचिरोली-विसापूर मार्गावरील नागोबा मंदिरात आयोजीत या कार्यक्रमाला मानवता पथ बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते

