गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-खंडित झालेल्या पावसामुळे दमदार पुनआगमनान जनजीवनावर प्रतिकूल परिणाम बघायला मिळत आहे संततधार पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील घरांची पडझड बघायला मिळाली गाडेगाव येथील रहिवासी केशव श्रीकृष्ण पदवाड यांच्या राहत्या घराची काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली केशव पदवाड यांच्या खाटे जवळ भिंत कोसळल्याने दैवबल्लतर म्हणून त्यांचा जीवितास कोणत्याही प्रकारची इजा ना झाली पदवाड यांच्या कुटुंबात एक मुलगा असून अत्यंत हालाखीच्या परिस्थिती हे कुटुंब जीवन जगत आहे आणि अशातच त्यांच्या घराची भिंत पडल्याने त्यांच्या निवारणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे येण पावसाळ्याची दमदार सुरुवात झाली आणि राहायला आळोचा नसल्याने या पदवाड कुटुंबावर नैसर्गिक संकट पडलं आहे तेल्हारा महसूल विभागाने वेळीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी व घटनेचा पंचनामा करून पदवाड कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी जेणेकरून हे कुटुंब पावसापासून रक्षण करू शकणार अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे .
रात्री पाऊस सुरू असताना एका एका आमच्या घराची भिंत कोसळली मी भिंतीजवळ झोपलेलो होतो माझे नशीब बलवत्तर होते म्हणून मी बचावलो तरी प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या घरात पडलेल्या भिंतीचा पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी जेणेकरून मी माझ्या परिवाराचे पावसाळा पासून रक्षण करू शकेल
केशव श्रीकृष्ण पदवाड
गाडेगांव