वृक्षारोपण व केकही कापण्यात आले
आरोग्याची काळजी घेण्याचे आ.धर्मराव आत्राम यांचे आवाहन
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ना.अजित पवार यांचे 22 जुलै गुरुवार रोजी वाढदिवस होते. वाढदिवसाचे औचित्य साधून आलापल्ली येथील आरोग्यवर्धिनी हॉस्पिटलमध्ये “आरोग्यम धनसंपदा अभियान” या संकल्पनेतुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
शिबिराचे उदघाटन आ. धर्मराव आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हे होते. उदघाटनीय स्थानावरून आ.धर्मराव आत्राम यांनी, आरोग्य हीच खरी संपत्ती असून गोरगरिबांचे आरोग्याची तपासणी व निदान व्हावे यासाठी ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्याने राज्यव्यापी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत असल्याचे उल्लेख करून पक्षातर्फे ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजनेची वाढदिवसाची खास अनोखी भेट देण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आणि प्रत्येकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे व स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचे आवाहनही यांनी यावेळी केले. अध्यक्षीय स्थानावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा केला जातो, लोकोपयोगी व लोकहिताचे कार्य करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर असल्याचे म्हणत ना.अजित पवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकून वाढदिवसाचे शुभेच्छा व्यक्त केले. यावेळी सरपंच शंकर मेश्राम, रा.महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी आपले मनोगत व्यक्त करून ना.अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले. त्या नंतर वाढदिवसाचा केक आ.धर्मराव आत्राम यांच्या हस्ते कापण्यात आले, तसेच आरोग्यवर्धिनी हॉस्पिटल परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षाचे रोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पा अलोने यांनी तर संचालन सुरेंद्र अलोने यांनी केले. उपस्थितांचे आभार सारिका गडपल्लीवार यांनी मानले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, डॉ.अल्का उईके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, लक्ष्मण येरावार, मलरेड्डी येमनूरवार, नारायण कासेट्टीवार आदी उपस्थित होते. यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, पूर्वा दोंतुलवार, ममता पटवर्धन, सुवर्णा पुसलवार, महेश अलोने, शैलेश पटवर्धन, सोमेश्वर रामटेके, स्वप्नील श्रीरामवार, कैलास कोरेत, मनोज बल्लूवार, मखमुर शेख, संतोष तोरे, राहुल गर्गम, सुमित मोतकूरवार, शुभम चिंतावार आदी व आरोग्य परिचारिका, आशा वर्कर व कर्मचारी उपस्थित होते.