सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबड येथे पार पडत असलेल्या ओबीसी मेळाव्यास बीड पोलिसांनी केला कडेकोट बंदोबस्त.
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रभर चर्चेला उधाण आले असून ओबीसी समाजाचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. दि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबड येथे ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कडेकोट बंदोबस्तात वाढ केली. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधीत रहावी यासाठी २ – अप्पर पोलीस अधीक्षक , ६ – पोलिस उपअधीक्षक, २० पोलिस निरीक्षक , ८५ उपपोलीस निरीक्षक, ७०० पोलिस अंमलदार , ५ तुकड्या दंगल नियंत्रण पथक, २ क्युआरटी पथके, १४ स्ट्रीकींग जवान आरपीचे जवानतैनात करण्यात आले होते. ओबीसी मेळाव्यास कोणत्याही गालबोट लागू नये मोठ्या पोलिस बंदोबस्तात ओबीसी पार पाडण्यात आला ण