जलील शेख
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : सध्या पाथरी तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यात विविध साखर कारखान्यात ट्रॅक्टर,बैलगाड्या आणि ट्रक इत्यादी वाहनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उसाची आवक चालू आहे. या मध्ये तालुक्यातील गोदावरी दुधना साखर कारखान्यात परिसरातील चोहीकडून कारखान्याला उस टाकण्यासाठी विविध वाहनांची दिवस रात्र रेलचेल चालू आहे. रात्री अंधारात ट्रॅक्टर आणि बैलगाड्या असे वाहन दिसत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पाह्याला व ऐकायला मिळत आहे. यानिमित्ताने कारखाना प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी जो धरत आहे.मागील आठवड्यातच माजलगाव येथील एक स्कॉर्पिओ अंधारात बैलगाडी-छकड्याचा अंदाज न आल्याने समोरासमोर धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये स्कॉर्पिओ आणि बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी अनेक गंभीर जखमी झाल्याचेही कळते. जखमी व्यक्तीच्या नातेवाईकाकडून असे सांगण्यात आले की,अंधारात गाडी बैल दिसलीच नाही. बैलगाडीला आणि बैलांच्या शिंगाला जर रात्री चमकणारे रेडियम लावण्यात आले असते तर हा अपघात झाला नसता.म्हणून साखर कारखाना प्रशासनाने नोंदणीकृत ट्रॅक्टर आणि बैलगाडी तसेच ऊस वाहतूक करणारे छकडे यांना रेडियम तसेच अन्य अपघात रोधक साधनसामग्रीचा उपयोग करून दररोज होणारे अपघातांना प्रतिबंध घालावा अशी मागणी पाथरी तालुक्यातील जनतेतून होत आहे. अन्यथा ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारासोबतच सामान्य प्रवाशांना आपला जीव गमवावा लागेल आणि साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयाचे खेटे मारावे लागतील यात शंका नाही.