सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १७ नोव्हेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालक्यात संविधान बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या संविधान बचाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दि.२४ ऑक्टोबर २०२३ ते दि. ६ डिसेंबर २०२३ नागपूर येथील दीक्षाभूमी ते मुंबई दादर येथील चैत्यभूमी असा या संविधान बचाव यात्रेला सुरुवात झाली असून असून दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजन केले असून अंबाजोगाई शहरात संविधान बचाव यात्रेनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून हि रॅली शहरातील माता रमाई चौक येथून निघणार असून यशवंतराव चव्हाण चौक – तथागत चौक-संत भगवान चौक संत भगवानबाबा चौक – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे चनई रोड येथील संघर्षभूमी या ठिकाणी या मोटारसायकल रॅलीचा समारोप होणार असून या संविधान बचाव यात्रेत मार्गदर्शन करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीयअध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. या संविधान बचाव यात्रेस जिल्ह्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन सेना बीड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.