पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
भारतीय लष्करात असलेल्या रामटेकचे सुपुत्र अक्षय अशोक भिलकर यांना कर्नाटकात प्रशिक्षणादरम्यान वीरमरण आले. ते जम्मू काश्मीरला तैनात होते. पण त्यांचे तीन महिन्याचे प्रशिक्षण बेलगाम कर्नाटकात सुरू होते.याच प्रशिक्षण काळात झालेल्या अपघातात अक्षय अशोक भिलकर यांना वीरमरण आले.
रामटेक येथील मूळ निवासी अक्षय अशोक भिलकर हे ६ वर्षापूर्वी भारतीय सैन्यात दाखल झाले होते. भिलकर कुटुंबातील एकुलता एक मुलगा असतानाही अक्षयने देशसेवेला प्राधान्य दिले होते. त्यानुसार कठोर मेहनतीच्या बळावर अक्षय भिलकर यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला होता. ते जम्मू काश्मीरात कर्तव्यावर होते. पण काही दिवसापूर्वी त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांना बेलगाम कर्नाटकात पाठवण्यात आले होते.तिथेच त्यांचा प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात त्यांना वीर मरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, ३ विवाहित बहिणी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण रामटेक शहरात शोककळा पसरली होती.कर्नाटकातील बेळगाव येथे प्रशिक्षणादरम्यान भारतीय लष्कराच्या मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले राजाजी वार्ड, रामटेक तहसील येथील रहिवासी अक्षय अशोक भिलकर यांच्यावर शहीद झाल्यानंतर रामटेकच्या अंबाळा तलावात संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेले आणि कर्नाटकातील बेळगाव येथे प्रशिक्षणासाठी गेलेले शहीद अक्षय अशोक भिलकर हे दिवाळीच्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहीद झाले. ज्यामध्ये विविध प्रशासकीय प्रक्रियेनंतर मंगळवारी सायंकाळी चार वाजता शहीदाचे पार्थिव रामटेक येथे आणण्यात आले. हुतात्माच्या स्मरणार्थ व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली, तर महिलांनी महामार्गावर रांगोळी काढून भावनिक श्रद्धांजली वाहिली, तर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून हुतात्माला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तर पोलीस विभाग नागपूर ग्रामीण आर,एस,आय मधुकर प्रधान यांच्यासह ९ पोलीस कर्मचार्यांनी गार्ड ऑफ ऑनरसह सशस्त्र सलामी देऊन २४ राउंड फायर करून मानवंदना दिली. शहीदांच्या अंत्ययात्रेत प्रशासकीय, राजकीय आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांसह नागरी सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.