प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१० नोव्हेंबर समाज हा आपुलकी व मायेच्या बंधनात असतो.समाजाप्रती आपण काही देणे लागतो ही भावना आपली असावी.त्या अनुषंगाने सेलू येथील श्री.परशुराम जन्मोत्सव समितीने पुढाकार घेऊन ब्राम्हण समाजातील गरजू व्यक्तींना फराळ ,कपडे व इतर साहित्याची अल्पशी भेट देण्याचा मानस प्रत्यक्षात अमलात आणला.आपण आनंदात दिवाळी साजरी करायची व आपला गरीब बांधव आर्थिक विवंचनेत आहे ही गोष्ट आम्हाला रुचली नाही. सेलू येथील दानशूर मंडळींचे आर्थिक पाठबळ आम्हांला प्राप्त झाले. सर्वांच्या सहकार्याने हा समाजउपयोगी उपक्रम आम्ही पूर्ण करू शकलो.ज्या वेळेस आम्ही गरजू व्यक्तींच्या घरी भेट घेऊन गेलो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व डोळ्यांतील आनंदाश्रू हीच आमच्या कार्याची पोच पावती आहे.समाजाप्रती कार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहोत.आयुष्यातली खरी दिवाळी यावर्षी साजरी केल्यासारखी वाटत आहे.असे मत सेलू येथील परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले.


