पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड 22 : महामार्गावर झालेल्या अपघातात जखमीना वेळेवर म्हणजेच पहिल्या तासाभरात प्रथमोपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचवण्यात मदत होते. या पार्श्वभूमीवर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड बाह्यवळण (अंधानेर फाटा) येथे महामार्ग पोलिसांकडून नुकतेच याचे प्रत्यक्षित दाखविण्यात आले.अपघाताचा प्रसंग उभा करून जखमींना कशा प्रकारे गोल्डन अवर मध्ये मदत करावी याची माहिती या वेळी देण्यात आली. महामार्ग पोलीस अधीक्षक अनिता जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ दिलीप टिपरसे,पोलीस निरीक्षक नंदनी चणापूरकर साहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी महामार्ग क्रमांक 52 वरील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या बाह्यवळण मार्गारिल (अंधानेर फाटा)नागरीक व्यवसायिक व वाहनचालक यांनां यांची माहिती दिली.अपघाताचे प्रमाण कशा प्रकारे कमी करता येईल तसेच अपघातातील गंभीर जखमीना तात्काळ गोल्डन अवर मध्ये कशा प्रकारे उपचार मिळतील याबाबतचे प्रात्यक्षित डॉ प्रतीक पांडुरंग दहिवाळ यांनी दाखविले.या वेळी स्थानिक ग्रामस्थासह महामार्ग पोलीस खुलताबाद केंद्राच्या हद्दीतील मृत्यूजय दुत पथकातील पोलीस अमलदार रामदास वाघ,रमेश धस,बापूराव जाधव,संदीप दुबे,अमर आळंजकर ,विकास फुटाणे,विश्वास पडूळ व पोलीस मित्र शांताराम सोनवणे ,शरद दळवी आदीची उपस्थिती होती.