गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- गाडेगाव-तुदगाव ग्राम रस्त्यामध्ये झालेल्या अवैध उत्खननासंदर्भात गडेगावचे ग्रामस्थ व शेतकरी यांनी केलेल्या तक्रारीवर तेल्हाऱ्याचे तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांनी एक आदेशान्वये महसूल मंडळ अधिकारी यांना अवैध उत्खनन स्थळ निरीक्षणाचे आदेश दिलेत.तेल्हारा येथील उद्योजक अनिल अग्रवाल, विनोद अग्रवाल यांनी हे नियमबाह्य उत्खनन जेसीबी द्वारे केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.त्याअनुषंगाने महसूल मंडळ अधिकारी विष्णू सौदागर,तलाठी बालाजी केंद्रे यांनी अवैध उत्खनन स्थळाचे वस्तुस्थितीदर्शक निरक्षण करून त्यासंबंधीचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केलाआहे.अवैध उत्खनन प्रकरणी दोषी व्यक्तींवर योग्य ती चौकशी होऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी गाडेगाव चे ग्रामस्थ व शेतकरी यांनी व्यक्त लावून धरली आहे.विशेष म्हणजे हा ग्राम रस्ता इंग्रज कालीन असून इ.स.1928 मधील महसुली नकाशात त्याची नोंद आहे.











