अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
मोरगाव भा. बाखराबाद येथे काल रात्रीच्या पावसामुळे गावकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. पावसाची वाट पाहत असणारा शेतकरी राजा जास्त पाऊस झाल्याने संकटात. नाल्याच्या काठी असणारे शेत केले खरडू तर घरांची झाली पडझड खूप लोकांच्या घरात पाणी साचले होते, घरात पाणी साचल्या मुळे धान्य व घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यामध्ये ओले झाले तर काही लोकांचे वाहून गेले. नाल्याकाठी असलेल्या शेतामधील शेतकर्यांच्या वस्तू तुषार सिंचन सठ, बोरवेलचे पाईप, ठिबक सिंचन हे सर्व वस्तू पुरामध्ये वाहून गेले. गावकऱ्यांच्या घरासमोरील असलेली वाहने पुरामध्ये वाहून गेले टू व्हीलर, ऑटो खूप मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या आर्थिक नुकसान झाले याकडे तातडीने सरकारने लक्ष देऊन शेतीचा व गावातील झालेले आर्थिक नुकसान यांचा सर्वे करण्यात यावा व नुकसान भरपाई देण्यात यावी.











