जया दांगटे
शहर प्रातिनिधि शेगाव
मलकापूर:- बेलाड शिवारात एक सामान्य मजुर कुटुंबातील सुनीता अर्जुन सांबारे यांच्या वर रानडुकराने प्राणघातक हल्ला केला चे वृत्त समजताच जाणीव फाऊंडेशन च्या वतिनि गणेश वाघ, ज्ञानेश्वर सांबारे, मनोज यादव यांनी 5000/- ही अल्पशी मदत एकत्र करुन अर्जुन सांबारे, बेलाड यांना सुपूर्द केली. काम करत असताना 26 जूनला अचानक रानडुक्करानेहल्ला केला आणि यामधे त्यांचा उजवा हात दंडापासून तोडला गेला. त्यांच्या उपचारासाठी पैशाची गरज होती त्या उपचाराकरीता गोदावरी हॉस्पिटल जळगाव खानदेश येथे भरती आहे.आर्थिक परिस्थिती पाहता आणि पुढिल उपचार करण्याकरिता एक अल्पशी मदत जाणीव फाऊंडेशन देण्यात आली. या मदतीसाठी दीगंबर बांगर, आशुतोष झनके, संजय रावणकार, दिनेश नावरकर, संघर्ष सावरकर, संदेश घेवंदे, सचिन ढोण, गणेश बाठे, अमर माळी, उमेश कोरडे, प्रतिभा मारोती पवार, सुमित्रा भिकुलाल झंवर, सुमीत दिलीप नागपुरे, श्रीकांत सावंत, दिग्विजय पाटिल, सुमीत सोनोने, विवेक वाकोडे, किशोर नंदाने यांचे सहकार्य प्राप्त झाले.