सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील रायपूर येथे कैलास अंबादास काकडे या शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागल्याने दोन गिर गायीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रात्री १०वाजेच्या दरम्यान घडली
सदर आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.
आग लागल्याने गावातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझविण्यासाठी कसरतीने प्रयत्न केले पण आग आटोक्यात आली नव्हती.विज पुरवठा खंडित असल्यामुळे अडथळा निर्माण झाला होता.
या घटणेची सकाळी ११वाजता तलाठी यांनी पाहणी केली कैलास अंबादास काकडे रा रायपूर यांचे सोनार गव्हाण शिवारामध्ये गट न १२२ मध्ये गोठा बांधलेला असुन रात्री. १० वाजेच्या सुमारास आग लागल्याने कोठ्या मध्ये बांधलेल्या दोन गिर गाई अंदाजे वय ५वर्ष स्पिकलर ३०नग ठिंबक १०बंड्डल पेट्रोल पंप वखर इ .अवजारे जळुन राख झाली आहे .अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याबाबत प्राथमिक अहवाल तलाठी सावत्रा जगदीश होणे यांणी वरिष्ठांकडे सादर केल्याबाबत कळविले होते.पशुवैद्यकीय अधिकारी आले नसल्याबाबत सांगितले
त्यावेळी ग्रामसेवक समाधान मवाळ व गावातील मंडळी हजर होती.