महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 22:-अभ्यासू, संयमी, मुत्सद्दी, स्पष्टेवक्तेपणा व संकटकाळी अचूक निर्णय घेऊन आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस भद्रावती तालुका आणि शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस तर्फे नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये गरजूंना बांधावर जावुन गरीब महीला शेतमजूर यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी वृक्षारोपनही करण्यात आले. तालुक्यातील कोकेवाडा(तु.), खोकरी, सागरा, शेगांव(खुर्द), आष्टी, बिजोणी, आगरा, मासळ-विसापूर, मानोरा(खुर्द), मांगली व कांसा या गावांत विविध कार्यक्रम घेऊन व वृक्षारोपन करुन रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी वृक्षारोपनही करण्यात आले व गावक-यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात
आले.यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, महिला अध्यक्ष साबिया देवगडे, शहर अध्यक्ष सुनील महाले, कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष फयाज शेख, शहर उपाध्यक्ष क्रिष्णा तुराणकर, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल लांबट, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, कोकेवाडा(तु.) येथील सरपंच विद्या सावसाकडे, खोकरीचे सरपंच सुनील पानतावणे, सागरा येथील उपसरपंच वैशाली जिवतोडे, शेगांव(खुर्द) येथील सरपंच मोहित लभाने, आष्टीचे सरपंच गोविंदा कुळमेथे, बिजोणीच्या सरपंच अल्का रोडे, मासळ-विसापूरचे सरपंच प्रफुल्ल टोंगे, मानोरा(खुर्द) येथील उपसरपंच नागो कामटकर, सागरा येथील सरपंच शंकर रासेकर, बेलगांव येथील सरपंच अरुण बदकी, मांगलीचे सरपंच बंडू मत्ते आदी मान्यवर उपस्थित होते.