प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी विद्यापीठ, दि. 2 नोव्हेंबर, 2023 कृषि विद्यापीठामार्फत पैदासकार बियाणेच्या उत्पादनाबाबत महाराष्ट्र शासन कृषि, विभाग यांनी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) यांच्याकडून केंद्र शासनामार्फत पैदासकार (ब्रीडर सीड) बियाणातील उत्पादनाचे इष्टांक लक्षांक कळविले जातात व त्यानुसार विद्यापीठ पैदासकर बियाणे बिजोत्पादनाचे नियोजन करते. पैदासकार बियाणे बीजोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. पैदासकार बीजोत्पादनासाठी केंद्र सरकारकडून अत्यल्प अनुदान मिळते मात्र राज्य सरकारकडून बिजोत्पादनासाठी कोणतेही अनुदान मिळत नाही. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत अखिल भारतीय समन्वयीत बियाणे प्रकल्प अंतर्गत मुलभूत बियाणे पैदास योजना कार्यरत आहे. कृषि खाते, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार विविध पिकांच्या विविध वाणांची शुध्द व दर्जेदार मुलभूत बियाणे उत्पादित करणे व उत्पादित झालेले बियाणे कृषि सहकार व शेतकरी कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी आवंटीत केलेल्या शासकीय/निमशासकीय संस्थाना विक्री करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे. मुलभूत व पायाभूत बियाणे कृषि सहकार व शेतकरी कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या लक्षांकानुसार वितरण केले जाते. तसेच विद्यापीठाच्या बिजोत्पादन कार्यक्रमासाठी वापरले जाते. उत्पादित बियाणे जर मुबलक प्रमाणात असेल तर या विभागामार्फत मुलभूत बियाणे खासगी कंपन्या व शेतकरी कंपन्यांना सामंजस्य करार करून वाटप केले जाते. सन 2019 पासून करार करून चारही विद्यापीठांकडून शेतकरी बिजोत्पादक कंपनी व खासगी बिजोत्पादक कंपनीला मुलभूत बियाणे पुरवठा करीत आहेत.