अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 03 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथे अश्विन पौर्णिमेला वर्षावासाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न झाला. बुद्ध आणी त्यांचा धम्म या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पवित्र अश्या धम्मग्रंथाचे वाचन आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यन्त 3 महिने चालणाऱ्या वर्षवासाच्या कालावधी मध्ये करण्यात आले. धम्ममित्र प्रशिक कांबळे, मनोज भवरे यांनी सदर ग्रंथाचे वाचन केले. याबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. यावेळी वनपाल शांतिदूत मुळे यांचे अभिनंदन व सत्कार सोहळ्या निमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच कपडे रुपी भेट निलेश वंजारी, मोहन कांबळे व बौध्द उपासक उपासिका यांचेतर्फे देण्यात आले. यावेळी गजानन मानकर, मोहन कांबळे, निलेश वंजारी, निलेश मानकर, सचिन कांबळे, दीपा कांबळे, जितेंद्र खरतडे, इंदूबाई कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देतांना वनपाल तथा वन क्षेत्र सहाय्यक शांतिदूत मुळे म्हणाले की, सर्व समाज बांधवांचे व गावाकऱ्यांचे आभार व्यक्त केले. तसेच आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून पत्नी व मुलींचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरंग कांबळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघमित्रा मुळे, जितेंद्र खरतडे, रूपक खरतडे, शंकर कांबळे, सुनील कांबळे, गजानन मानकर, सविता कांबळे, दीपक कांबळे, दादाराव पेटकुले आदीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन कांबळे यांनी केले. तर आभार रोशन लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सत्यशील भवरे, प्रशिक कांबळे, निलेश वंजारे, शुभम ननपट्टे, अमित कांबळे, चरण भगत, रोशन लोखंडे, संमेज कांबळे, संदीप कांबळे, सिद्धार्थ मानकर, मनोज मानकर, सचिन कांबळे, आशिष मानकर, सत्यशील भवरे, मनोज भवरे, शुभम कांबळे, अमोल कांबळे, आशा मानकर, इंदुबाई वंजारे, इंदुबाई कांबळे, वच्छलाबाई वानखेडे, रमाबाई मुनेश्वर, प्रणिता कांबळे, सपना मुनेश्वर, प्रणिता मानकर, सुमन मानकर, उज्वला कांबळे, रंजना मानकर, रुक्साना कांबळे, दीपा कांबळे, दीपक मुनेश्वर, विजय पेटकुले, दत्ता पेटकुले, दादाराव पेटकुले, बंडू कांबळे, माया कांबळे, संतोषी कांबळे, वच्छला ननपट्टे, आशा कांबळे, वैशाली कांबळे, शालू लोखंडे, फुलनबाई कांबळे, श्रिया लोखंडे, आशन्का कांबळे, स्नेहल कांबळे, प्रेरणा कांबळे, चिकू सदानंद लढे, विलास ननपट्टे आदींनी अथक परिश्रम घेतले.