सचिन भुसाळे
ग्रामीण प्रतिनिधी डोंगरगाव.
अति पावसामुळे कुरुळी येथील पाझर तलाव फुटला आणि 18 एकर शेत जमीन खरडून गेली. त्यामुळे नप्ते नामक शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या घटनेला चार महिने लोटत असतानाही शासनाकडून मदत मिळाली नाही सिंचन विभाग व शासनाच्या दिरंगाई विरोधात ६ नोव्हेंबर पासून नप्ते कुटुंब तहसील समोर उपोषणाला बसणार आहे.
कुरोळी शिवारात ४०-५० वर्षापासून सिंचनाची व्यवस्था म्हणून शासनाने सिंचन विभागाकडून पाझर तलाव बांधला होता जुन जुलै महिन्यात ढगफुटीसदश पाऊस त्यात परिसरात झाला त्यामुळे कुरुळी पाझर तलाव फुटला तलावा लागत यादव नप्ते सुनीता नप्ते आणि स्वराज्य नप्ते यांची शेतजमीन कायमस्वरूपी नुकसान झाले. तर ११एकर जमिनीतील उभ्या पिकांचे नुकसान झाले यात, १० लाखांच्यावर नुकसान झाले आहे या अगोदर नुकसान भरपाई मिळण्यासाठी महसूल प्रशासनास मदतीची मागणी केली होती मात्र दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात येत्या ६ नोव्हेंबरला नप्ते कुटुंब उपोषणाला बसणार आहे याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड व तहसीलदार देऊळगावकर यांना निवेदन देण्यात आले आहे.