उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी;तळोदा
तळोदा: तळोदा तालुक्यात व शहरात मागील काळात अनेक घरफोड्या होऊन लाखोंचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला आहे यातील बहुतांश घरफोड्या ह्या घर बंद ठेवून बाहेरगांवी गेलेल्या नागरिकांकडे झाल्या असून नुकतीच घरासमोर लावलेली चारचाकी गाडी चोरट्यानी चोरून नेल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे केले होते आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बंद घरे फोडून चोऱ्या होऊ शकतात म्हणून दिवाळीसाठी बाहेरगांवी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील मौल्यवान सोन्या चांदी च्या वस्तू ऐवज व किंमती सामान सोबत घेऊन जाव्यात किंवा इतरत्र ठेवून जाव्यात घरे व्यवस्थित बंद करून जावेत तसेच याबाबत शेजाऱ्यांना पोलिसांना माहिती देऊन जावी या बाबत जनजागृती साठी पोलिसांनी सुद्धा प्रसिद्धी पत्रक काढून तसेच रिक्षा फिरवून लाऊडस्पीकर द्वारे जनजागृती करून नागरिकांनी सतर्कता व सुरक्षितता राखण्यासाठी जनजागृती करावी रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे लवकरच दिवाळी सणाला सुरूवात होत असून शहरात राहणारे अनेक कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेरगांवी नातलगांकडे किंवा आपल्या मूळ गांवी जातात तळोदा शहर व तालुक्यात झालेल्या बहुतांश चोऱ्या घरफोड्या ह्या दिवाळीत घरे बंद ठेऊन बाहेरगांवी किंवा नातेवाईकांकडे गेलेल्या घरांमध्येच झालेल्या आहेत त्यात अनेकांचा लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे त्यातील अनेक चोऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आले आहे बहुतांश घरफोडी व चोऱ्यांच्या घटना ह्या तळोद्यातील कॉलोनी भागात गावाबाहेरील वस्त्यांमध्ये झाल्या आहेत त्यात अनेक घरं ही लांब अंतरावर विरळ वस्तीत आहेत अनेकदा चोरी झालेल्या ठिकाणी श्वान पथकाने सुद्धा बायपास पर्यंतच माग काढला आहे म्हणजे चोरटे कॉलोनीत चोरी करून बायपास वर लावलेल्या वाहनातून पसार होतात असा निष्कर्ष निघाला आहे अनेक चोरी प्रकरणात शेजाऱ्यांना सुद्धा जवळचं कुटुंब बाहेरगांवी गेल्याचे माहीत नसल्याने चोरी झालेलं कुटुंब बाहेरून आल्यावरच घरफोडी झाली किंवा चोरी झाल्याचे माहीत झाले आहे एवढी अनास्था बाहेरगांवी जाणाऱ्यानी ठेवू नये आपण बाहेरगांवी जात असल्याचे कमीतकमी शेजाऱ्यांना तरी सांगून जावे आपल्या घरातील मौल्यवान चीज वस्तू सोबत न्याव्यात किंवा इतरत्र सुरक्षित ठिकाणी ठेवून जाव्यात किंवा एखादा व्यक्ती वर घर सांभाळण्याची जबाबदारी देऊन जावी याबाबत जनजागृती साठी पोलिसांनी सुद्धा एखादं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून कॉलोनी शहरात गांवात रिक्षा फिरवून लाऊडस्पीकर द्वारे जनजागृती करावी
त्याच प्रमाणे दिवाळी सुट्टी काळात कॉलोनी व गांवा बाहेरील परिसरातील गस्त वाढवावी अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .
“”नागरिकांनी सुरक्षितता व खबरदारी बाळगून मौल्यवान वस्तू किंमती सामान घरात ठेवून बाहेरगांवी जाऊ नये या बाबत शेजारयांना पोलिसांना माहिती देऊन जावे जेणेकरून त्या भागात गस्त वाढविता येईल याबद्दल जनजागृती साठी लवकरच पोलिसांतर्फे पत्रक प्रसिद्ध करून त्याची माहिती रिक्षा द्वारे लाऊडस्पीकर वरून देण्याची व्यवस्था केली जाईल “”
‘राहुल पवार ; पोलीस निरीक्षक
तळोदा पोलीस स्टेशन ‘











