मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे:श्री संत खपती महाराज संस्थान बागापूर येथे 133 वा जयंती महोत्सव सोहळा व खपती महाराजांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि 5/11/2023 रोजी महंतांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.संपूर्ण विदर्भामध्ये खपती महाराजांच्या भक्तांचे जाळे पसरलेले असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात जयंती महोत्सव बागापुर येथे साजरा करीत असतात.रविवार दि.5/11/2023 रोजी सकाळी 10/30 वाजता पूर्व पूजन व स्नपन विधी केला जाईल त्यानंतर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती प्रसाद वितरण होईल. त्याचं दिवशी दुपारी 12/30 वाजता बागापूर येथे महाप्रसाद यावेळी प्रमुख उपस्तिती म्हणून अध्यक्ष खपती महाराज संस्थान निरंजन भाऊरावजी चौधरी, श्री संत भिकाराम महाराज सुरडकर पोहूर जिरा, श्री संत मंगेश महाराज नाग मंदिर चांदूरवाडी, श्री पांडे गुरुजी बल्लारशा, श्री गणेश महाराज गादीचालक मनीराम बाबा संस्थान बग्गी, लक्ष्मणराव गमे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी,जनार्धनजी बोथे सरचिटणीस गुरुकुंज आश्रम मोझरी, प्रकाश दादा वाक्प्रचार प्रमुख गुरुकुंज मोझरी आश्रम, यांची उपस्तिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप अडसड, आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर, आमदार राजेश इकडे मलकापूर, मोहनजी गिरी चंद्रपूर उपस्थित राहणार आहे. तरी भाविक भक्तांनी संत खपती महाराज प्राणप्रतिष्ठा सोडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विश्वस्त यांनी केले आहे.