अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 1 नोव्हेंबर – घाटंजी तालुक्यातील एका पत्रकाराला हद्दपार करण्याची मागणी, यवतमाळ जिल्हा बळीराजा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत धांदे, असलम कुरेशी या सह अनेकांनी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय होटे यांचे मार्फत निवेदन देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे लेखी तक्रारीतुन केली आहे. घाटंजी येथील एका वृत्तपत्राचे पत्रकार कज्जुम कुरेशी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच संबंधित पत्रकार हा समाजातील काही लोकांना हाताशी धरून घाटंजी येथील ठाणेदारांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे अशा अनेक ठिकाणी तक्रारी केल्या आहे. तसेच संबंधित पत्रकाराने घाटंजी पोलीसांनी माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगत असुन अनेक पत्रकाराची दिशाभूल करुन तशा बातम्या अनेक वृत्तपत्रातुन खोट्या व बनावट बातम्या प्रकाशित करवुन घेत असल्याचा आरोप प्रशांत धांदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित पत्रकाराचे वडील व भाऊ यांचे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गोवंश हत्याचे भादंवि नुसार अनेक गुन्हे दाखल असल्याचे लेखी तक्रारीत नमूद आहे. तसेच पत्रकार कज्जुम कुरेशी यांनी या पुर्वी घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या विरोधात घाटंजी शहरात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी करुन अनेक वृत्तपत्रात तशा बातम्या प्रकाशित करवुन आणल्या होत्या. विशेष म्हणजे संबंधित पत्रकार हा हेतू पुरस्सर हिंदू धर्माच्या लोकांना चिथावणी देऊन भडकावत असल्याचा आरोप तसेच जातीय दंगल घडविण्याच्या उद्देशाने नागरिकांना भडकवत आहे, असा आरोप लेखी तक्रारीतुन प्रशांत धांदे, असलम कुरेशी, प्रशांत गावंडे, आकाश मोगरे, विजय पेंदोर, शंकर बावणे, राहुल गिनगुले, प्रकाश कोवे, बंडु वेट्टी, रोशन आत्राम, सतिष बावणे, सैय्यद ईसराईल, अय्युबखाॅ महेमुदखाॅ पठाण, प्रकाश नेवारे, रवि सिरपुरे आदिंनी केली आहे. दरम्यान, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांचेशी संपर्क केला असता, पत्रकार कज्जुम कुरेशी यांचे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल खंडणीचा गुन्हा हा फिर्यादी सचिन बिसमोरे यांच्या लेखी तक्रारीवरुन नोंदविण्यात आला आहे. संबंधित पत्रकारांविरुद्ध नियमानुसार व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याचे विरुद्ध यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेत सि.आर.पि.सी. 107, 116 (3) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास अंतीम टप्प्यात असुन लवकरच घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे, ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी सांगितले. घाटंजी येथील पत्रकार कज्जुम कुरेशी याची प्रतिक्रीया घेतली असता, मी कुणालाही खंडणीची मागणी केलेली नाही. माझ्या विरोधात फिर्यादीने घाटंजी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली आहे. तसेच मी कुठेही जातीय तणाव निर्माण केलेला नाही. तक्रारदाराने माझ्या विरोधात केलेली हद्दपारीची तक्रार चुकीची असून माझी बदनामी करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर केली आहे, असे कज्जुम कुरेशी यांनी स्पष्ट केले.