पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
रामटेक : तालुक्यातील उमरी येथील शेतकऱ्याच्या घरी बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करीत तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दि.३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेषराव बुद्धूजी शेरकुरे रा.उमरी यांच्याकडे दुधाळ जनावरे असून त्यांनी आपल्या घराच्या मागच्या बाजूला सर्व जनावरे बांधले होते.सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरामागे बांधलेल्या गायीवर हल्ला चढविला व तिला गंभीर जखमी केले.अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्याने सर्व जनावरांत व गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या गायीला जखमी करून पडून जाण्यास यशस्वी झाला.घटनेची माहिती तात्काळ रामटेक वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी पोहचुन घटनेचा पंचनामा केला.गायीवर होणाऱ्या वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागाने द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.विशेष म्हणजे या परिसरात वाघाने व बिबट्याने जवळपास ७ ते ८ वेळा जनावरांची शिकार केली असल्याची चर्चा आहे.









