अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
वाशिम रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवर बॅरेजेस होण्याचा मार्ग मोकळा झाला असुन दि.१३ एप्रिल २०२३ रोजी रिसोड येथील भाजपच्या भव्य संकल्प सभेत माजी खासदार माजी मंत्री अनंतरावजी देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पैनगंगा नदीवर बॅरेजेसची करण्याची मागणी केली होती तसेच रिसोड-मालेगांव विधानसभा मतदार संघातील ब-याच समस्या उपमुख्यमंत्र्याकडे मांडुन त्या सोडविण्यासाठी मागणी केली होती.त्यामध्ये मुख्यत्वे पैनगंगा नदीवरील बॅरेजेसची मागणी माजी खासदार देशमुख यांनी केली होती.यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरी बंधा-यातील अपुरे पाणी तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवानी केलेली हजारो कि.मी.पाईपलाईनची आर्थीक गुंतवणुक,वीज कनेक्शन या शेतकरीं बांधवांच्या अडचणी व व्यथा माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर मांडल्या आणि शेतकरी बांधवाना आर्थीक अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी पैनगंगा नदीवर बॅरेजेसची मागणी केली होती.त्यावेळी भव्य संकल्प सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासंदर्भात सांगितले होते.आणि त्यानंतर आपण बॅरेजेसचा प्रश्न मार्गी लावु असे आश्वासीत केले होते.त्यांनतर माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांनी उपविभागीय मृद व जलसंधारण उपविभाग यांच्याशी पाणी उपलब्ध्दता पत्रा संदर्भात दि.१९ मे २०२३ रोजी पत्र व्यवहार केला होता.त्यानंतर दि.२९ मे २०२३ रोजी पाणी उपलब्ध असल्याचे सविस्तर माहितीपत्रक माजी मंत्री अनंतरावजी देशमुख यांना विभागाकडुन प्राप्त झाले.त्यानंतर भाजपचे रिसोड-मालेगांव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड.नकुलदादा देशमुख यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीमध्ये ५१५० सघमी एवढे पाणी उपलब्ध असुन रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवर उपबंधा-याचे रूपांतर बॅरेजेस मध्ये होण्याच्या संदर्भात पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जलसंपदा विभागास येवती,आसेगांव पेन,चिचांबापेन,मसला पेन,धोडप,भापुर,बाळखेड येथे बॅरेजेस करण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेशीत केले असुन शेतक-यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न माजी मंत्री अनंतरावजी देशमुख यांच्या मागणीने भाजप नेते ॲड.नकुलदादा देशमुख यांचे अथक प्रयत्न व शिस्तबध्द पाठपुरावा व राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेद्रजी फडणवीस साहेब यांची कृषी विकासाची भक्कम दृष्टी यामुळे मार्गी लागणार आहे.