मनोजगवई
तालुकाप्रतिनिधी
चांदूर रेल्वे
चांदुररेल्वे:चांदूर रेल्वेच्या राजर्षी शाहू सायन्स कॉलेजला नॅकचा अ दर्जा प्राप्त झाल्यामुळे कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.शहरातील राजर्षी शाहू सायन्स कॉलेजला १८ व १९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅशनल असेसमेंट अँड क्रिडेशन कौन्सिल (नॅक) समितीने भेट दिली.सदर संस्था संस्थांच्या मूल्यांकनास मान्यता देते. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वपरिचित अशा महाविद्यालयाची मूल्यांकनाला समोर जाण्याची ही दुसरी वेळ होती. त्रिसदस्य समिती सदस्यांनीमहाविद्यालयाचे मूल्यांकन केले. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाला अ दर्जा सीजीपीए ३.०२ दिला.अतुल विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षा प्रा उत्तराताईजगताप,उपाध्यक्षा डॉ. वैष्णवी जगताप, सचिव प्रा. डॉ. वीरेंद्र जगताप आणि या कोषाध्यक्ष परीक्षित जगताप यांनी या श्रेणीबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे. व प्रभारी प्राचार्य डॉ. एम. पी. चिखले, समन्वयक डॉ. मीनल केचे व तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे भरभरून कौतुक केले. या यशाबद्दल बोलताना प्रा.उत्तराताई जगताप यांनी हे यश म्हणजेच संघटित व एकत्रितपणे केलेल्या परिश्रमाचे फळ असल्याचे मत व्यक्त केले.


