तेजस ढाकणे
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव : तालुक्यातील निंबेनांदूर मध्ये पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजातून पाठींबा सकाळी शनी मंदिर शेजारील सभामंडप येथे आयोजित कार्यक्रम झाला. यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवरांचा शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, “एक मराठा लाख मराठा” जय घोषात मराठा योध्या मनोज जरांगे यांच्या लढास सर्वानुमते पाठींबा दिला. तर जो पर्यंत सकल मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय पक्ष यांच्या आजी माजी आमदार खासदार मंत्री यांना गावात प्रवेश नाकारला गेला आहे असे सर्व समाजातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.यावेळी निंबेनांदूर वाडी वस्तीवरील तरुण,गावातील ग्रामपंचायत,सोसायटी सह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.