अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील घोटी येथे वनपाल शांतीदूत मुळे व कुटूंबियांचे अभिनंदन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिलदार व्यक्तिमत्व व समाजिक कार्यकर्ते असेलेले वनरक्षक शांतीदूत मुळे यांची वनपाल पदी पदोन्नती व उमरखेड येथे पदस्थापना झाल्यामुळे घोटी येथील अनाथपिंडक बुद्ध विहारात घोटी विभागाच्या वतीने अभिनंदन व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष किशोर भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे पाईक असलेले शांतिदूत मुळे हे घाटंजी तालुक्याचे खरे अनाथपिंडक आहेत. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शांतिदूत मुळे व त्यांच्या पत्नीचा किशोर भगत व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जितेंद्र खरतडे परिवाराकडून कपडे रुपी व सुभाष गोडघाटे परिवारांकडून तथागतांची मूर्ती भेट देण्यात आली. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आर्णी येथील डॉ. निलेश कांबळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष किशोर भगत, वंचीत बहुजन आघाडीचे घाटंजी तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे, रा. वि. नगराळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील नगराळे, पत्रकार प्रदीप वाकपैजन, सुभाष गोडघाटे आदीं मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून घोटी येथील तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष अरविंद राठोड, अधिक्षक आर. ए. राठोड, निखिल पवार, मानसिंग राठोड, शेख अयुब, संघमित्रा मुळे आदीं उपस्थित होते. यावेळी संघपाल कांबळे यांनी आपल्या मनोगतात शांतिदूत मुळे यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुनील नगराळे, रा.वि.नगराळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निलेश कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देतांना वनपाल शांतिदूत मुळे म्हणाले की, सर्वांनी सोबत हातात हात घेऊन चळवळीचे काम केल्यास सर्व समाजाची प्रगती लवकर होईल, असे सांगून घोटी सर्कल मधील सर्व गावकऱ्यांचे आभार मानले. यावेळी कोतवाल म्हणून निवड झालेल्या अनुसया रूपक खरतडे यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घोटी सर्कल मधील पाटापांगरा येथील मोहन कांबळे, गजानन मानकर, आत्माराम कांबळे, सचिन कांबळे, दादाराव पेटकुले, बिलायता येथील संदीप पाटील, कपिल आडे, माणुसधरी येथील सिद्धार्थ भगत, सचिन बन्सोड, ताडसावळी येथील बंडू मुनेश्वर, अशोक सोनटक्के, मांजरी येथील निलेश पाटील, खडका येथील अविनाश कांबळे, नामापूर येथील रत्नरक्षित देवतळे, कवठा येथील प्रेमानंद उमरे यांचे सह मोठया संख्येने महिला, पुरुष व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भीमजयंती उत्सव समितीचे सदस्य जितेंद्र खरतडे, राजू खरतडे, प्रेमानंद उमरे, रूपक खरतडे, निलेश पाटील, सुमित भगत, सिद्धार्थ लढे, सुनील भगत, सचिन बन्सोड, अमित कांबळे, शुभम कांबळे, निखिल पवार, अर्चना खरतडे, अनुसया भगत, ज्योती खरतडे, वैशाली गायकवाड, वंदना लढे, अनुसया खरतडे, दुर्गा भगत, आशा मानकर, जोत्स्ना कांबळे, माया गोडघाटे, मयुरी गोडघाटे यांनी केले होते. संचालन अशोक खरतडे यांनी केले. तर आभार जितेंद्र खरतडे यांनी मानले.


