राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधि दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथील एका विद्यालयात दहव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय मुलाने एकतर्फी प्रेमातून विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली.या प्रकरणी प्राप्त माहिती नुसार दिग्रस तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी कलगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.ती गावातून शाळेत जाण्यासाठी रिक्शाने कलगाव येथे आली असता गावातील एका 24 वर्षीय युवकाने तिचा पाठलाग केला.कलगाव येथे रिक्शातून उतरली असता त्या युवकाने मुलीचा हात धरुन मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हटले मुलीने विरोध केला असता त्या युवकाने मुलीला शिविगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.घडलेला प्रकार पिठीतेणे वडिला ला सांगितले.पिठीतेच्या वडीलांनी दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरुन दिग्रस पोलिसांनी त्या नराधमावर कलम 354 ,354अ,354 ड,323 ,504 ,506 ,पोक्सो अन्तर्गत गुन्हे दाखल केले आहे.घटनेचा पुठील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मानकर करित आहे .