गणेश ताठे
तालुका प्रतिनिधी ,अकोट
अकोट: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असताना. अकोट तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोशन चिंचोलकर यांची नियुक्ती काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रभारी प्रदेश सचिव नितेश वानखडे यांच्या मान्यतेने ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निनाद मानकर यांनी अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्षअशोक मानकर यांचे उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. रोशन चिंचोलकर आधी काँग्रेस पक्षाचे विविध संघटनेत काम केलेले असून त्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहे, युवकांविषयी आंदोलने, रुग्णसेवा अनेक समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहे त्यांचे समाज उपयोगी काम बघून त्यांची ही नियुक्ती पक्षश्रेष्ठींनी केली. रोशन चिंचोलकर यांच्या नियुक्तीने त्यांचे मित्र मंडळ आत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास, काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, अकोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक मानकर, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश गणगणे, प्रदेश प्रवक्ता डॉ सुधीर ढोणे, प्रदेश महासचिव डॉ अभय पाटील, कामगार काँग्रेस मा. प्रदेशाध्यक्ष मो. बद्रूजमा, अकोटचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजीवनीताई बिहाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सभापती प्रशांत पाचडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांना दिले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)