बिहारीलाल राजपुत
तालुका प्रतिनिधी भोकरदन.
भोकरदन तालुक्यातील अनेक गावात मराठा बांधवांचे साखळी उपोषण व ठिय्या उपोषण सुरु आहे आणी आता ठिकठिकाणी अमरण उपोषणासाठी ही अनेक गावात मराठा तरुणांनी तारखा जाहीर करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. मा.मनोज जरांगे पाटलांना अनेक मराठा विरहीत सामाजिक संस्थेच्या सदस्यांनीही आपला सामाजिक पाठिंबा जाहीर केला आहे,तर अनेक गावात,गाव पातळीवरील ग्रामपंचायत सदस्यांनी,आपापले पदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केले आहे.भोकरदन तालुक्यातील मा.पंचायत समिती सभापती श्री लक्ष्मणराव दळवी यांची कन्या सौ.गिता प्रमोद गावंडे यांनी भोकरदन येथे बस स्थानका जवळ असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सकल मराठा समाजाची एक सभा घेऊन आपण ग्रामपंचायत सदस्य पदाचा सोमवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तर आव्हाना ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच व सद्यस्थित सदस्य असलेले श्री दामोधर पाटील ठाले यांनी ही आपल्या पदाचा राजीनामा देणार आसल्याचे सांगीतले. दैनिक अधिकारनामा चे प्रतिनिधीनी प्रश्न केला की,सदस्य साहेब मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपल्या राजीनाम्याने काय फरक पडणार आहे ॽ तर प्रश्नाला उत्तर देतांना सौ गिता प्रमोद गावंडे व दामोधर पाटलांनी सांगीतले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज अख्ख्या महाराष्टात मराठी वणवा पेटलेला आहे, हा वणवा एका चिमणीच्या चोची तील पाण्याने विझण्या सारखा नाही पण भविष्यात कधीही ह्या प्रश्नांवर चर्चा होईल, तेंव्हा चिमणीचे नाव वणवा विझवणारी म्हणूनच येईल. आम्ही मराठा समाजाचे देणेकरी आहोत.आमच्यावर समाजानी दाखवलेला विश्वास हा आमच्या साठी जास्त मोलाचा असून, सदस्य पद हे समाजाच्या मागणीपुढे काहीच नाही, म्हणून आम्ही राजीनामा देत आहो.भोकरदन तालुक्यातील अनेक गावात अश्या प्रकारे राजीनामा सत्र सुरु झाल्याने व राजकीय पुढारी व नेत्यांना गावबंदी कार्यक्रम सुरु झाल्याने अनेक दिग्गज पुढारी व नेत्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून भोकरदन पोस्ट ऑफीस पर्यंत मराठा रणरागिणींनी,या आमदारांचे करायचे कायॽ खाली मुंडके वर पाय,मनोज दादा के सन्मानमे रणरागिणी मैदानमे अशा घोषणा देत एक भव्य रॅली काढून मराठा आरक्षणावर जे कहीच बोलत नाही अश्या मराठवाड्यातील सर्व आमदारांना, साडी,चोळी कुंकू-बांगडी चा आहेर पोस्ट ऑफीस मधून दिवाळीची भेट म्हणून पाठविला आहे. यावेळी तालुक्यातील विविध गावामधून मराठा रणरागिणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.आमदारांना पाठविलेला साडी चोळी चा आहेर हा सामुहीक न पाठविता वेगवेगळ्या गावातील महिलांनी वैयक्तिक आपल्या स्वत:च्या नावाने पाठवीला आहे. सत्ताधारी आणी विरोधी दोन्ही कडील आमदार आणी नेत्यांना पाठविलेला हा साडी चोळी आणी कुंकू बांगडीच्या पाठविलेल्या ह्या आहेरा बद्दल आतातरी त्यांचे तोंड उघडणार आहे की नाही.ह्या बाबीवर रणरागिणीसह भोकरदन तालुक्यातील सर्व ठिय्या आंदोलक व साखळी उपोषण कर्त्यांच्या आशाळभुत नजरा लागलेल्या आहे.शेवटी रॅली चे जाहीर सभेत रुपांतर होवून महिला प्रमुखांनी आरक्षणाच्या बाबतीत आपापले विचार प्रगट करून मार्गदर्शन केले. व सभा विसर्जित झाली.यावर आता आमदार काय प्रतिक्रिया देणार ह्या कडे भोकरदन तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.