सचिन डोळे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापुर
पुणे : जिल्ह्याच्या इंदापुर तालुक्यातील कुंभारगांव येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल नामदेव धुमाळ व उपाध्यक्षपदी निता उमेश सल्ले यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीची 2023-2024 ते 2024-2025 या दोन वर्षासाठी निवड करण्यासाठी पालक सभा पार पडली. पालकामधुन प्रशांत तुकाराम बंडगर, किरण विठ्ठल डोळे, सविता शिवाजी सल्ले, विजय रूपचंद भोई, स्वाती कुमार नगरे, सुवर्णा अजय देवगिरे, सारीका आजीनाथ धुमाळ, सोनाली नितीन गोरे, राजकुमार महादेव कांबळे, आण्णा आजीनाथ चव्हाण, शहाजी ज्ञानदेव पानसरे याची सदस्य म्हणुन निवड करण्यात आली.
सदस्यांनी सर्वानुमते अध्यक्षपदी अनिल धुमाळ व उपाध्यक्षपदी निता सल्ले याची बिनविरोध निवड केली. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला, सर्व पालकांच्या व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचिताचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामस्थ संजय मोरे संजय धुमाळ रमेश डोळे दत्ता नगरे संजय ढोले. उपसरपंच उदय भोईते स्वप्निल लोंढे उपस्थित होते.


