आकाश बुचुंडे
ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव
मारेगाव : वणी येथील इंदुरकर महाराज यांचे भव्य असे कीर्तन सोहळा येत्या 3 नोव्हेंबर ला शासकीय मैदान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुणयतिथीनिमित्त भव्य असे कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका एरिगेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने कार्येक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. 3 नोव्हेंबरला दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम शासकीय मैदान पाण्याची टाकी येथे असून सर्व समस्त नागरिकांनी कार्यक्रमाचा अवश्य असा आस्वाद घ्यावा.