व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी, आर्थिक साक्षरता ही अत्यावश्यक गरज ठरली आहे. आज बरेचशे आर्थिक व्यवहार online झाल्यामुळे त्याबद्दल पुरेशी माहिती अत्यावश्यक आहे. जेणेकरून स्वतःला आर्थिक फसवणुकीतुन वाचविता येईल. पैशाच्या योग्य विनियोगाचे तंत्र समजून घेणे व योग्य ठिकाणी बचतची सवय लावणे आज तुम्हाला अत्यावश्यक आहे,असा कानमंत्र योगेश जेट्टीवार व्यवस्थापक, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखा आलापल्ली यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला. ते राजे धर्मराव कला- वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यु.टिपले हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. एन. टी. खोब्रागडे आणि महाविद्यालयीन वरीष्ठ प्राध्यापक डॉ. आर. एन. कुबडे हे उपस्थित होते.अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. एम. यु. टिपले म्हणाले की, उद्याचे आयुष्य सुखात जाण्यासाठी बचत करणे फार गरजेचे आहे तर डॉ. एन. टी. खोब्रागडे यांनी विविध प्रकारे होणारी आर्थिक फसवणूक कशी थांबवावी हे विविध उदाहरणाने पटवून सांगितले आणि डॉ. आर. एन. कुबडे यांनी स्वतःचे वैयक्तिक अनुभव नोंदवून महाविद्यालयीन दशेतच बचतीची व योग्य खर्चाची सवय कशी लावावी हे पटवून दिले. आर्थिक साक्षरतेचे औचित्य साधून महाविद्यालयीन करिअर संसदेची स्थापणा करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डी. टी. डोंगरे यांनी केले तर प्रास्ताविक महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक डॉ. आर. डब्ल्यू. सूर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डी. आर. मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक तथा प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद तथा बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.