मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण. चितेगाव व्हिडिओकॉन कंपनी समोर रहात असलेल्या रमा नगर येथील मुलींचा दगडखान खदान पाण्यांत बुडून मृत्यू झाला असून. २२.ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी काही महिला सोबत कपडे धुण्यासाठी गेली असता मानसी निलेश गायकवाड वय १२ वर्षे सकाळी ९.३० च्या दरम्यान कपडे धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून खोल पाण्यात गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी सोबत असलेल्या दोन महिलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आले त्या महिला देखील मानसीला वाचवत असताना पाण्यात बुडत होत्या.काही अंतरावर तेथील जवळपास असलेल्या वाहन चालक ड्रायव्हर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ येऊन या महिलांना व मानसीला बाहेर काढले. तोवर मानसीचा मृत्यू झालेला होता. मानसी गायकवाड मोहटादेवी हायस्कूल फारोळा शिक्षण घेत होती. अतिशय गुणी व मनमिळाऊ मानसीच्या जाण्याने रामनगर येथील लहान मोठ्यांना दुःख झाले असून सर्वजण हळहळ व्यक्त आहे.