प्रफुल्ल लाहोटी शहर प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- वाशिमची मुख्य बाजार पेठ ही पाटणी चौक असून सदर चौकात सर्वच प्रकारची दुकाने असल्याने व वाशिम हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे साहजिकच खेड्यापाड्यातील लोक खरेदी करिता याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात परंतु याठिकाणी हातगाडीवर फळ विक्री करणारे फळ विक्रेते आपली हातगाडी रस्त्यावरच उभी करत असल्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते सदर चौकात वाहतूक पोलिस असूनही वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे फळ विक्रेते रस्त्यावर आपली फळ विक्री करीत आहे त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सदर प्रकरणात नगर पालिका व वाहतूक पोलिसांनी लक्ष घालून सदर फळ विक्रेत्यांचा बंदोबस्त लावावा अशी नागरिकांची मागणी आहे