भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारांवर समाज विघातक शक्तिचे हल्ले खोट्या व तांत्रिक प्रकरणात विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होत असल्याने पत्रकारांच्या सुरेक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच त्यांचे परीवार उघड्यावर येत असुन मुलाबाळांच्या पालनपोषणासह त्यांच्या आरोग्याचा तथा शिक्षणा विषयक असलेली उदासीनता असे एक ना एक अनेक प्रश्न पत्रकार बांधवा समोर उभा आहे.या व इतर बाबींमुळे ज्ञानकल्पना प्रतिष्ठान व्यथित झाले व सन २०१३ पासून इतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे समाजाचे महत्वपूर्ण अंग असलेल्या पत्रकारांना पण न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार संघ च्या माध्यमातून काम सुरू केले.उध्देश एकच राष्ट्रीय पत्रकार संघ सन्माननीय पत्रकार बांधवांना संपूर्ण पणे समर्पित आहे व पत्रकार त्यांचा परिवार पाल्य.अन्याय अत्याचार पासून संरक्षण आणि न्याय मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी ज्ञानकल्पना प्रतिष्ठान राष्ट्रीय पत्रकार संघाने घेतली आहे.पत्रकार बांधव यांना शासनाने मानधन प्रतिमाह मानधन द्या आरोग्य,विमा, निवृत्ती नंतर पेंशन, त्यांच्या अपत्यांना शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, चौकशी नंतर दोषी असल्यासचे निदर्शनास आले तर गुन्हे दाखल करा चौकशी पुर्व गुन्हे दाखल होवु नये, मुलींच्या विवाहासाठी बेटी सन्मान करा या इतर मागण्यांसाठी जानेवारी २०२४रोजी दिल्ली येथे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाने केंद्र शासनास ठराव पारित करून करण्यात येणार असल्याचे ज्ञानकल्पना प्रतिष्ठान चे राष्ट्रीय अध्यक्ष निरधारी जाधव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निरधारी जाधव यांनी प्रदेश संपर्क नेते दिलीप वेदपाठक, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, मार्गदर्शक व सल्लागार जेष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे, प्रदेशाअध्यक्ष जितु चोले, राजकीय आघाडी जिल्हाध्यक्ष किशन दामा राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष सौ सुरेखा तळणकर, सरपंच आघाडी जिल्हाध्यक्ष निळकंठ मस्के, तालुका प्रमुख शेख वसीम, तालुका प्रसिद्धी प्रमुख (वाई बाजार सर्कल ) पंकज बेहरे पाटील, शहर प्रमुख ऋशिकेश खंदारे,उप शहर प्रमुख अक्षय परळकर,तर व्यापारी आघाडी (सुवर्णकार) शहर प्रमुख कुंदन तिवडकर युवा आघाडी माहुर शहर प्रमुख कनिष्क वानखेडे, संजय अन्नमवार,यांची नियुक्ती करून नवरात्र महोत्सवाच्या पावन पर्वावर कार्यारंभ केला आहे.


