विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: योगेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ डिकसळ आयोजित खास महीलांकरीता गुरुवार (ता. 20)रोजी नवरात्र उत्सवानिमित्त दिग्दर्शक लेखक पंकज यादव भाऊजींचा होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमात गावातील महीलांनी उपस्थित राहून आगळा वेगळा आनंद घेतला.योगेश्वरी मंडळातर्फे खास महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध बक्षीसांचे ही आयोजन केले होते. प्रथम क्रमांकास मानाची पैठणी, द्वीतीय क्रमांकास सोन्याची नथ व त्रितीय क्रमांस चांदीचा छल्ला व ज्येष्ठ महिलांसाठी ही विशेष बक्षीस होते, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ स्वरुपात पाच मानाच्या साड्या बक्षीस स्वरुपात दिल्या गेल्या. होम मिनिस्टर कार्यक्रमात पंकज यादव भाऊजींनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन सर्व महिलांचे मनोरंजन केले.विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेत महिलांचे नंबर काढण्यात आले. प्रथम क्रमांक शिवानी निखिल काळे मानाची पैठणी द्वीतीय क्रमांक शामल अक्षय शिर्के सोन्याची नथ त्रितीय क्रमांक सुवर्णा नवनाथ भोंग चांदीचा छल्ला लकी ड्रॉ विजेत्या लिलाबाई हनुमंत पवार, रूपाली सचिन पवार, अनिता सुनील कुंभार, गौरी भारत चव्हाण तर वरिष्ठ ज्येष्ठ महिला स्पर्धेमध्ये छायाबाई महादेव गवळी यांना बहुमान मिळाला.
दिग्दर्शक लेखक पंकज यादव भाऊजी व त्यांची टीम अक्षय शिर्के व धनश्री भोसले यांनी महीलांचे खुप छान पद्धतीने महीलांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजयकुमार गायकवाड यांनी केले व आभार अंजली प्रवीण गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश्वरी नवरात्र उत्सव तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. बक्षीसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते न करता सादरकर्ते पंकज यादव व त्यांच्या टीमच्या हस्ते करण्यात आल्यामुळे योगेश्वरी नवरात्र तरुण मंडळाचे या ठिकाणी विशेष असे वेगळेपण दिसले. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण गावात कौतुक होत आहे.


