कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच माझ्या शेतकरी बांधवांना 25% आगाऊ पीक विमा मिळणार आहे, अतिवृष्टी आणि पावसाचे अपयश आणि पिकांवर यलो मोझॅक विषाणूमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.पीक विमा कंपनीला पीक विमा काढण्याचे आदेश देऊनही त्यांनी आयुक्तांकडे दाद मागितल्याने पीक विमा मिळण्यास विलंब होत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेऊन महसूल आयुक्तांना लेखी पत्र देऊन पीक विमा तातडीने भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.कंपनीचे अपील फेटाळत महसूल आयुक्तांनी 25% पीक विमा आगाऊ भरण्याचे निर्देश दिले आहेत.याबाबत लेखी आदेश मा. जिल्हा कृषी अधीक्षकांनी पीक विमा कंपनीला दिला असून लवकरच शेतकऱ्यांना आगाऊ पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे.


