शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : मराठा आरक्षणा साठी महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीसमोर आज दि. 19 ऑक्टो.रोजी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष छगन शेरे व सेलू तालुक्यातील शेतकरी यांनी मराठा समाजातील निजाम कालीन मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा महसुली नोंदी असलेले दस्तऐवज तसेच १९५० पुर्वी जन्मलेल्या श्री रंगनाथराव कदम रा.देऊळगाव गात यांचा कुणबी जातीचा दाखला व कुणबी -मराठा यांच्यातील रोटी-बेटी व्यवहार होत असल्याचा अँड बालासाहेब रोडगे व सौ इंद्रायणीताई बालासाहेब रोडगे यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सप्रमाण सादर केले. तसेच तालुक्यातील इतर अनेक कुणबी म्हणून नोंदी असलेले दस्तावेज समितीकडे सुपुर्द केले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे,विभागीय आयुक्त मधुकरराव आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते.


