दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी सन २०२३-२४ करिता सादर केलेल्या
अंर्थसंकल्पातील कौशल्य विकास विभागांतर्गत अर्थसंकल्पातील परिच्छेद क्रमांक ११२ प्रमाणे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ निर्माण करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली होती. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र कार्यक्रमाचे उद्घाटन आज रोजी दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.यावेळी व्हर्चुअल पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,कौशल्य व विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते.त्याचबरोबर या कार्यक्रमाला बोरद येथे तळोदा,शहादा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी, पंचायत समितीचे उपसभापती विजयसिंग राजपूत,जिल्हा परिषद सदस्य सुनीता पवार,भरत पवार, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर,जिल्हा कौशल्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक नंदुरबारचे मंगेश वाघ,समन्वयक म्हणून शासकीय तांत्रिक विद्यालय तळोदा येथील संजय खेमोत, कैलास चौधरी,विरसिंग वळवी, विठ्ठल बागले, शानू वळवी,प्रतिभा व्होकेशनल ट्रेंनिंग सेंटर बोरदचे अध्यक्ष, काशीनाथ ढोडरे, सरपंच अनिता भिलाव,उपसरपंच निलिमा जाधव, ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील,केंद्रप्रमुख दशरथ वायकर,प्राचार्य निलेश सूर्यवंशी,पर्यवेक्षक भटू पवार,रउफ शहा, यशवंत मोठे,प्रवीण वळवी,प्रकाश वळवी,बळीराम पाडवी,नारायण ठाकरे,गोपी पावरा,दशरथ ठाकरे,आंबूलाल साठे,दारासिंग वसावे,दरबारसिंग पाडवी, रवींद्र भिलाव त्याचबरोबर बोरद परिसरातील सरपंच, उपसरपंच जि.प.तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी हे प्रामुख्याने उपस्थित होते.