मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदूर रेल्वे:शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गरजू रुग्ण व आश्रम शाळेतील विद्यार्थी येतात अश्यात सकाळी 9 वाजता पासून लॅब टेकनिशियन व रक्तगट तपासणी विभागातील कर्मचाऱ्यांची वाट रूग्णांना 10.30 पर्यत पहावी लागत असल्याचे चित्र स्थानिक ग्रामीण रूग्णालयात दिसत आहे.शहरात रूग्णांना प्राथमिक उपचार मिळावे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र तर आहे परंतु डाॅक्टर वेळेत उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे आज सकाळी ग्रामीण रुग्णालयात 9 वाजता पासून ग्रामीण रूग्णालयात रूग्ण उपस्थित असताना डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैर सोय होत असून या कडे दुर्लक्ष केल्या जात आहे.एकीकडे व्हायरल ताप,डेंगू अश्या आजाराने थैमान घातले खाजगी रुग्णालया सोबत ग्रामीण व शहरी भागातील गरजू जनता प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन रक्त तपासणी व उपचार घेतात अश्या वेळेस या दवाखान्यात लॅब टेकनिशियन नसल्यामुळे रूग्णांना तासनतास वाट पाहत उभे राहवे लागते या समस्येवर वरीष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना यांनी लक्ष घ्यावे अशी मागणी नागरीक करीत आहे.