प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१६ ऑक्टोंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजास मिळावे यासाठी पदुदेव जोशी पालमकर व अविनाश जोशी पालमकर या दोन्ही बंधूंनी आझाद मैदान मुंबई येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी दि. १६ ऑक्टोंबर पासून उपोषणा सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत कित्येक संघटनांनी जाहीर पाठिंबा त्यांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे .समाजामधून अनेक समाज बांधव पण त्यांना भेटी देत आहेत .परभणी, बीड ,लातूर ,नांदेड नंदुरबार ,जिंतूर, हिंगोली ,औंढा, पालम, येथून अनेक समाज बांधव जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन आले आहेत. आपापल्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहेत. परभणी येथील आ. राहुल पाटील यांनी उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पण अद्याप उपोषणाला चार दिवस झाले आहेत तरीपण सरकारने किंवा जबाबदार मंत्री समुदायाने यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. म्हणून ब्रह्मन समाजात नाराजीचा सूर निघत आहे. उद्या पाथरी येथून येथून जाहीर पाठिंबा देण्यासाठी नितीन पाटील, वैभव मुळे, मनोज केदारे, विजू गाजरे , अभय लोखंडे, विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघाच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. उपोषणकर्त्यांशी फोनवर चर्चा केली असता त्यांच्याकून असे कळाले की आतापर्यंत कोणीही आमची दखल घेतलेली नाही समाज बांधवांच्या वतीने विविध शहरातून खेड्यांतून तालुक्यातून उपोषणकर्त्यांना फोन चालू आहेत असे उपोषण करते पदुदेव पालमकर व अविनाश पालमकर यांनी सांगितले. जर सरकारने यांच्या मागणीकडे विशेष लक्ष नाही.दिले तर प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात नाना प्रकारे आंदोलने व उपोषण केल्या जाईल असे समाज बांधवांकडून कळाले.