प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी
दि१५ ऑक्टोंबर पासून तालुका पाथरी येथील दसरा मैदानातश्री आई तुळजाभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला . या नवरात्र महोत्सवा त अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यात भारुड, आराधी गोंधळ, किर्तन, लहान मुलांच्या स्पर्धा, महिलांच्या नानाविध स्पर्धा, तसेच प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात येत आहेत रोज सकाळी ८-३० वाजता व रात्री ८-३० वाजता देवीची आरती मोठ्या थाटामध्ये होत आहे .दोन्हीही वेळी आरतीसाठी नामदेव नगर, माळीवाडा, पुरा, व पाथरी शहरातून अनेक भक्त आवर्जून आरतीला उपस्थिती लावत आहेत .आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम चालू आहेत. या नवरात्र महोत्सवाचे आयोजक सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. या नवरात्रात अध्यक्ष महादेव गवारे, उपाध्यक्ष पुष्पराज नाईक, सचिव राम हिलकुटे, सहसचिव विठ्ठल थोरात, कोषाध्यक्ष आकाश क्षीरसागर, सदस्य चंद्रसिंग नाईक, मार्गदर्शक समस्त भक्तगण नामदेव नगर , पुरा ,माळीवाडा ,व पाथरी शहर, दसऱ्याच्या दिवशी महा प्रसादपंगतीचे आयोजन करण्यात आली आहे.