सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी,लातूर
लातूर:-जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.16/10/2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.मौजे गंगापूर ता. जि. लातूर येथील गट नंबर 8 पैकी प्लॉट नंबर 21 या जागेचे मंजूर नकाशा व गुंठेवारी नसताना व नियमाप्रमाणे मूल्यांकन न दाखविता कमी मूल्यांकनाचे चलन स्वीकारून गोविंद मचकटे सह दुय्यम निबंधक वर्ग 2 लातूर 1 यांनी बेजवाबदारपणे दिनांक 2 .12. 2022 रोजी खरेदी करत दस्त करून दिलेला आहे. या प्रकरणात कारवाई व्हावी म्हणून मा. सह जिल्हा निबंधक श्री ध. ज. माईनकर वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे 16.01. 2023 रोजी तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने वेळेत कारवाई होत नसल्यामुळे यांच्याकडे वारंवार स्मरणपत्र देऊन मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे व मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे तक्रार दाखल करून त्याप्रमाणे वेळीच कारवाई व्हावी आणि या प्रकरणात प्रशासनाचे लक्ष वेधवे म्हणून पत्र देऊन दिनांक 16.10. 2023 पासून मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 16 10 2023 पासून बेमुदत धरणे उपोषण धरणे आंदोलनास बसलेला आहे सदर प्रकरणात वेळीच कारवाई न झाल्यास आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल. त्यानंतर तरीही कारवाई न झाल्यास मा. न्यायालयात या प्रकरणात दाद मागावी लागेल याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा आंदोलन करते श्री सुधाकर सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.

