अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील येरंडगांव येथील विद्यार्थीनी कु. अश्विनी अनिलराव इंगळे ही ITI मध्ये भारत देशात प्रथम आल्याने तिचा मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यवतमाळ येथे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी कु. अश्विनी सोबत तिची आई रंजना वडील अनिलराव व भाऊजी आवर्जून उपस्थित होते.
या सत्कार प्रसंगी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, यवतमाळ जिल्हा जिल्हा प्रमुख उमकांत पापीनवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संपर्क प्रमुख राजुदास जाधव, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख डॉ. विष्णू उकंडे, युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश राठोड, शिवसेनेचे घाटंजी तालुका प्रमुख निलेश चव्हाण, घाटंजी शहर अध्यक्ष वसंत मोरे, युवासेनेचे अजित ठाकरे आदीं मान्यवर उपस्थित होते. घाटंजी तालुक्यातील येरडगांव (ता. घाटंजी) येथील विद्यार्थीनी कु. अश्विनी इंगळे हि ITI मधे देशातुन प्रथम आली आहे. तसेच तिला नागपूर येथील मिहान प्रकल्पात संधी मिळावी याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी कु. अश्विनी इंगळे हिला आकाश राठोड च्या सांगण्यावरून पालकमंत्री संजय राठोड यांनी शिफारस पत्र सुद्धा दिले आहे. कु. अश्विनी इंगळे हिच्या मुळे घाटंजी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्याचे नांव देशात नावलौकिक झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी या वेळी काढले.
कु. अश्विनी इंगळे हिने आपल्या यशाचे श्रेय घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राहुल पळवेकर व रोशन राणे सर व आई वडीलांना दिले आहे.

