अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : पारवा वनक्षेत्र कार्यालयतंर्गत (प्रादेशिक) कार्यरत वनरक्षक शांतिदूत मुळे यांची वनरक्षक या पदावरून वनपाल या पदावर पदोन्नती झाली असल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ व अभिनंदन सोहळा वन परिक्षेत्र अधिकारी मनिष पवार यांच्या अध्यक्षतेखाली पारवा वन वसाहत येथे नुकताच देण्यात आला आहे.वनरक्षक शांतीदूत मुळे हे अतिशय मनमिळाऊ, शांतता प्रिय, लोकप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ता म्हणून ख्याती मिळवलेले होते. शांतिदूत मुळे यांची उणीव आता सर्वांनाच होणार असल्याचे त्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभा मध्ये त्यांचे सहकारी वनाधिकारी, वनकर्मचारी यांनी मनोगतातून व्यक्त केले. तसेच कुठलीही अडचण आल्यास तिचे निराकरण त्वरित करण्यात त्यांचा हातखंडा असल्यामुळे अनेकांना त्यांचा खूप फायदा होत असे. वनपाल शांतीदूत मुळे हे सर्वांना वेळोवेळी मदत करणारे म्हणून परिचित आहे. शासकीय कर्तव्य पार पाडतांना सामाजिक कार्यही त्यांनी केले. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीची धुराही समर्थपणे त्यांनी घाटंजी तालुक्यात सांभाळून वाढवलेली आहे. असे दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या शांतिदूत मुळे यांची पदोन्नती वनपाल म्हणून उमरखेड तालुक्यातील सोनदाभी वन्यजीव वनपरीक्षेत्रात झाली असल्यामुळे अभिनंदन सोहळा व निरोप समारंभाचा कार्यक्रम पारवा वन परीक्षेत्राच्या वतीने घेण्यात आला. वनपाल शांतीदूत मुळे यांचा वन परिक्षेत्र अधिकारी मनिष पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गिफ्ट देऊन करण्यात आला. यावेळी पोलीस उप निरीक्षक उत्तम गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पवार मॅडम, गायकवाड मॅडम, मुळे मॅडम, तसेच शांतिदूत मुळे यांच्या आई या प्रमुख उपस्थित होत्या. तसेच विशेष उपस्थितांमध्ये पांढरकवडा येथील सहाय्यक वन संरक्षक आर. बी. कोंडावार, पांढरकवडा वन परिक्षेत्र अधिकारी बाळापुरे हे हजर होते. यावेळी ‘बॅचिंग’ करण्यात आले. कार्यक्रमात सर्वच वन कर्मचारी सहपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रेमीला सिडाम यांनी केले. तर आभार गजानन गहूकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुर्ली बिटचे वनपाल तथा वन क्षेत्र सहाय्यक धम्मानंद मेश्राम, पारवा येथील वनपाल शेख मन्सुर, पाटापांगरा येथील वनपाल दिलीप बोडखे, वनपाल मोहंमद शमी, वनरक्षक गजानन गहूकार, येसनसुरे, जाटवा, सोडगीर, जाधव, गजभिये, वेट्टी, जामकर, पूजा सिडाम, मीनाक्षी पाटिलखेडे, पवन आत्राम, गणेश, सुधाकर व इतर वनमजूर आदींनी अथक परिश्रम घेतले.