संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या १४ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून यापैकी ९ खेळाडुंची सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी खेळाडू व मैदानी प्रकार पुढीलप्रमाणे –
१७ वर्षाखालील मुलां- मुलींच्या गटात –
विश्वास चंदू चव्हाण ३ कि.मी. धावणे- तृतीय आला आहे.कु.ज्योती मोहन आडे ३ कि.मी. चालणे क्रीडा प्रकारात तृतीय आली आहे.तर सुरज राठोड बांबू उडी-तृतीय आली आहे.
१९ वर्षाखालील मुले व मुली गटात:-
गोळा फेक-आर्यन तारी-
द्वितीय क्रमांक,तर थाळी फेक मध्ये त्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.क्रॉसकंट्री क्रीडा प्रकारात पार्थ पाटील,मंगेश बोभाटे,सर्वेश रावराणे,अथर्व गुरव,दिपक जाधव,सुरज तांबे- प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. हातोडा फेक क्रीडा प्रकारात शार्दुल गुरव याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.याच क्रीडा प्रकारात सोहम घाडी याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.हातोडी फेक क्रीडा प्रकारात
कु.पूर्वा धुरी हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळालेल्या खेळाडुंची सांगली(मिरज) येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा दत्तात्रय मारकड,दिवाकर पवार,विनायक पाताडे, अवधूत काणकेकर, ऋषिकेश खटावकर, सौ.रजनी कासार्डेकर, सौ.पुजा पाताडे,सौ.वैष्णवी डंबे व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, इतर सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी कुचेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत यशस्वी ठरलेले कासार्डे विद्यालयातील खेळाडू व सोबत प्राचार्य, पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक व इतर मार्गदर्शक शिक्षक


