दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी वाचन प्रेरणा दिवस तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना वाचनामुळे जीवनाला गती व आकार मिळतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एन. शर्मा यांनी केले. या संगणक युगात वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. वाचनाकडे दुर्लक्ष करू नये. वाचन खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देते. वाचनाने अशिक्षितपणा दूर होतो असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. तसेच लेखक कवी संपादक अशा वेगवेगळ्या पदांवरती व्यक्ती पोहोचू शकते एवढी ताकद वाचनात आहे.असे मत डॉ. एस. आर. गोसावी यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. महेंद्र माळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस.के.श्रीवास्तव, प्रा. जे.के. पिंपरे, प्रा.पी. आर. बोबडे, प्रा. डॉ.आर एल.राजानी, प्रा. शिवदास प्रधान., पराग कर्णकार आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.











