दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी एकल अभियान अंतर्गत तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहतीतील जिवननगर(गोपाळपूर) येथे जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत बिलगाव येथील संघ विजयी ठरला.एकल अभिमान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या खेळाच्या विविध सामन्यांचे आयोजन हे दरवर्षी होत असते.यावर्षीच्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा जिवननगर येथे घेण्यात आल्या.स्पर्धांचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे. जिल्हा सेवा प्रमुख डॉ.शांतीलाल पिंपरे यांनी केले केले.या स्पर्धेला पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा यांची विशेष प्रेक्षक म्हणून उपस्थिती लाभली होती. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्राचे वाटप शहादा,तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंचल श्रीहरी समिती अध्यक्ष भजेंद्र शिंदे, सरपंच मोगी पावरा, सरपंच तोरमा वळवी, अस्मानी तळवी, पोलीस पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, शहादा आंचल अभियान प्रमुख मांगीलाल वसावे, शिक्षा प्रमुख गुलाब पावरा, ग्रामस्वराज्य प्रमुख भरत पावरा, आचार्य रामदास पावरा, संच प्रमुख शिलदार पावरा, दशरथ तडवी, चौधरी तडवी, जोरदार पावरा हे उपस्थित होते. या स्पर्धेत कबड्डी, लांब उडी, रनींग खेळ प्रकारातील विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत १३ मुला-मुलींच्या संघांनी भाग घेतला. त्यात मुलांच्या संघात बिलगाव व पिंपळखुंटा येथील कबड्डी संघ यांच्यात अंतिम सामना रंगला. त्यात बिलगाव संघ विजयी ठरला तर पिंपळखुंटा संघ उपविजेता ठरला. बिलगाव संघात जगन पावरा हा कर्णधार होता,तर देवसिंग पावरा ऑल राऊंडर होता. भावला पावरा, फोपा पावरा, विशाल पावरा, सुभाष पावरा, कालुसिंग पावरा, प्रदीप पावरा, ज्ञानेश्वर पावरा, गणेश वसावे असे प्रमुख खेळाडू संघात होते.या सर्व खेळाडूंचे मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी होणेकामी जि.प.शाळा जिवननगरचे शिक्षक, शालेय समिती, व गावकऱ्यांनी सहकार्य केले.