वसंता पोटफोडे
शहर प्रतिनिधी राळेगाव
तालुक्यातील आष्टा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चे राळेगांव तालुका अध्यक्ष विकास मुन व तालुका महासचिव प्रकाश कळमकर, विधानसभा अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश फुलमाळीयांच्या हस्ते रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वं.ब.आ.च्या महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा सौ. धम्मावती वासनिक, महासचिव सरला चचाणे, उपाध्यक्षा वंदना ऊरकडे, पूर्वीच्या उपाध्यक्षा सौ अश्विनि फुलमाळी,कळंब शहर अध्यक्ष सुगतजी नारायणे,राळेगांवशहर अध्यक्ष दिपक आटे निलेशराव स्थुल, आष्टा गाव चे सरपंच विशाल तोडासे उपस्थित होते.
आष्टा गाव शाखेचे अध्यक्ष म्हणून अजय दारुंडे, उपाध्यक्ष मिलिंदजी भगत, सचिव संजयजी फुलमाळी, संघटक सौ. साधना गांजरे, सहसचिव सौ. स्नेहा भगत, सौ. सुदर्शना फुलमाळी, अश्विनी कांबळे, मंदा कांबळे, मनोज राव दारुंडे, अतुल थुल,दिवाकरजी ओंकार, प्रदिप राव कांबळे इत्यादि सदस्यांची पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुगतजी नारायणे यांनी पक्षाची भूमिका आणि आजचे नासलेले राजकारण यावर प्रकाश टाकला, माता सावित्रीबाई फुले आणि आजच्या महिला यावर वासनिक ,चचाने व उरकूडे ताई यांनी मनोगत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोणत्याही एका जातीधर्माचा नसून सर्व समावेशक पक्ष आहे, संविधानाचे संरक्षण करून आपल्या वरील होणारा अन्याय दूर करण्याचे एक माध्यम आहे. यासाठी सर्व जातीतील नागरिकांनी एकत्रित येऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी ऊभे राहून सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करण्याचे आवाहन अध्यक्ष विकास मुन यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे संचलन दादा राव गांजरे यांनी केले तर आभार अध्यक्ष अजय दारुंडे यांनी केले. यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.