दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी शहादा, तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून चौगाव ते तळोदा तालुका हद्द कलमाडी पर्यंत रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुका शहर व ग्रामीण पत्रकार संघातर्फे वेळोवेळी जनतेच्या मागणीतून संघातील वार्ताहरांकडून आपापल्या दैनिकात बोरद ते कलमाडी रस्त्याच्या दूर अवस्तेबाबत बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या.अधिकारनामानेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.त्या दृष्टीने आज रोजी सायंकाळी ०६.०० वाजता शहादा,तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून चौगाव ते कलमाडी या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्याने या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.आमलाड ते बोरद व कलमाडी ते शहादा या रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी झाले होते. परंतु तेव्हा बोरद ते कलमाडी या दोन किलोमीटर रस्त्याचे काम रखडले होते. शासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याचा विसर पडला की, काय अशी भावना लोकांमध्ये निर्माण झालेली होती. या संदर्भात वेळोवेळी अनेक जनसामान्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. तसेच या रस्त्याबाबत आ.राजेश पाडवी यांच्याकडेही वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. कारण या रस्त्यावरून साधे पाई चालणेही शक्य होत नव्हते. एवढी दुरवस्था या रस्त्याची झालेली होती. ही सर्व बाब लक्षात घेता.आ. राजेश पाडवी यांनीही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना या रस्त्याबाबत दुरुस्तीसाठी विशेष सूचना केल्या होत्या. या सूचनेचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चौगाव ते कलमाडी पर्यंत ची तळोदा तालुक्याची हद्द असलेला ०८ किलोमीटर रस्त्यासाठी ‘विशेष दुरुस्ती अंतर्गत ०८.५० कोटी रुपयांचा निधी’ मंजूर करण्यात आलेला आहे.या अंतर्गत चौगाव ते बोरद चौफुली पर्यंत आहे तेवढ्याच रुंदीचा रस्ता हा दुरुस्त होणार असून बोरद पासून जाणारा शहादा बायपास रस्ता बोरद गावाच्या हद्दीपर्यंत अर्थात बोरद गावापासून लागलेल्या शहादा वळण रस्त्यापर्यंत कॉंक्रिटीकरण अंतर्गत दुरुस्त करण्यात येणार आहे. तसेच बोरद ते शहादा कडे जाणाऱ्या तळोदा तालुक्याच्या हद्द पर्यंत म्हणजेच कलमाडी गावाच्या अलीकडे असलेल्या हद्दीपर्यंत हा रस्ता उत्तम दर्जाचा बनवण्यात येणार आहे.या रस्त्याची रुंदी ०७ मीटर असणार असल्याचेही सार्वजनिक आ.राजेश पाडवी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.या रस्त्याबाबत हा विशेष निधी मंजूर करून आणल्याबद्दल बोरद तसेच परिसरातील आणि शहादा परिसरातील गावकऱ्यांमार्फत आ.राजेश पाडवी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे.या भूमिपूजन समारंभाला परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठी उपस्थिती लाभली होती. यात आ.राजेश पाडवी यांच्यासह , जिल्हा परीषद सदस्य सुनिता पवार,पंचायत समिती तळोदाचे उपसभापती विजयसिंग राजपूत ,प.स.सदस्य चंदन पवार, बोरद गावाचे सरपंच अनिता भिलाव, तळवे सरपंच मोग्या भिल, उपसरपंच निलिमा जाधव, खरेदी विक्री संघाचे संचालक जितेंद्र पाटील, किशोर पाटिल, मा. उपसभापती रविंद्र पाटील,नारायण ठाकरे,विरसिंग पाडवी, रविंद्र भिलाव, प्रकाश वळवी,शाम राजपूत,दारासिंग वसावे,गोपी पावरा,तऱ्हावद सरपंच दिलीप ठाकरे, खेडले सरपंच धरमदास ठाकरे, शांतीलाल पवार, कांतीलाल भिल, तंटामुक्त उपाध्यक्ष, सतीश महेश्वरी,मनोज जोहरी, ग्रा.प.सदस्य विठ्ठल ढोडरे,ग्रा.प.सदस्य साजन शेवाळे, निलुबाई ठाकरे, गायत्री भीलाव, ज्योतिबाई साळवे, अजय मगरे, लताबाई पवार, भरत पवार, राजु राजपुत, प्रवीणसिंग राजपुत,अनिल वळवी,हे उपस्थित होते.